कोल्हापूरातील कारखाने 750 कोटी रुपये शॉर्ट मार्जिनमध्ये

कोल्हापूर, 23 मे 2018 : देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उत्पादन पुणे विभागात आणि त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात होते. मात्र, साखरेच्या दर घसरणीचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांने सध्या 750 कोटी रुपयांच्या शॉर्ट मार्जिनमध्ये (अपुरा दुरावा)असल्याने कारखाने अडचणीत आले आहेत. याच कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांमधून जानेवारी अखेर 2018 पर्यंत सुमारे 60 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यात साखरेचे दर घसरल्याने प्रत्येक साखर कारखाना 30 ते 40 कोटी रुपयांपर्यंत शॉर्टमार्जिनमध्ये गेले आहेत. याचा फटका ऊस दर देण्यावर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी साखर हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांनी प्रतिटन उसाला 3500 रुपये दर मागितला होता. यावेळी प्रतिक्विंटल साखरेची किंमत 3500 ते 3600 रुपये होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रतिटन उसाला 3000 रुपयांपर्यंत दर देणे शक्‍य झाले. प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू होताच पंधरा ते वीस दिवसातच प्रतिक्विंटल साखरेचे दर सरासरी 500 रुपयाने घटले. त्यामुळे, बॅंकांकडून साखरेच्या किंमतीच्या तुलनेत होणारे मुल्यांकनही कमी झाले. दर कमी झाल्यानंतर बॅंकांनी प्रतिक्विंटल साखरेसाठी 3100 रुपये मुल्यांकन केले. यातून 85 टक्के म्हणजे 2600 रुपये प्रतिक्विंटल उचल मिळाली. यापैकी 750 रुपये प्रक्रिया खर्च, बॅंकेने दिलेल्या कर्जाच्य हप्ते, यामध्ये कारखान्यांच्या हातात 1880 रुपये ऊस दर देण्यासाठी रक्कम शिल्लक राहत आहेत. यामध्ये उसासाठी प्रतिटन 3000 रुपये देणे शक्‍य होत नाही. तर, एफआरपीनूसार ठरलेला दर तत्काळ द्यावा, यासाठी शासन नोटीस बजावत आहे. तर विविध संघटना कारखान्यांवर एफआरपी देण्याबाबत दबाव टाकत आहेत. दरम्यान, शासन घेत असलेल्या प्रति क्विंटल ३००० रुपये किमान दरामुळे दिलासा मिळणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here