शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव गरजेचा – चंद्रशेखर घुले

चीनी मंडी, कोल्हापूर: “शेतमालाला हमी भाव गरजेचा आहे. व्यापारी हमी भावाने माल खरेदी करत नसले तरी शेतकरी व व्यापारी यांच्यातील मालाच्या फरकाची रक्कम शासनाने अनुदान म्हणून त्यांच्या खात्यात जमा करावी,” असे आवाहन माजी आमदार चंदशेखर घुले यांनी शेवगाव येथील बाजार समितीमध्ये शेतकरी-व्यापाऱ्यांच्या बैठकीत केले.

घुले म्हणाले,”सरकारने मालाच्या बाबतीत अध्यादेश काढला असून, तो आजपर्यंत बाजार समित्या व सहायक निबंधक कार्यालयांना मिळालेला नाही. निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप सरकार असा अध्यादेश काढून सहानुभूती दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. परंतु, या अध्यादेशाचा अभ्यास केला असता शेतकऱ्यांच्याच मालास याचा सर्वाधिक फटका बसणार असे दिसून येते.”
व्यापारी बापूसाहेब गवळी, दगडू बलदवा, पुरुषोत्तम धूत यांनी, “हमी भावाप्रमाणे माल घेण्यास आम्ही तयार असून आम्ही तोच माल विकत असताना त्याच मालाला तो भाव मिळत नाही. अशा परिस्थितीमुळे आम्हाला अधिकच त्रास होत आहे. त्यामुळे यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,” अशी मागणी केली.
बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, ‘ज्ञानेश्वर’चे संचालक काकासाहेब नरवडे, रामनाथ राजपुरे, मोहन देशमुख, उपसभापती रतन मगर, व्यापारी पुरुषोत्तम धूत, कैलास देहाडराय, प्रल्हाद शिंदे, सूर्यकांत मोता, पुरुषोत्तम बिहाणी यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here